फलटण चौफेर दि २२ ऑक्टोबर २०२५
सासवड ता फलटण गावात अतिशय दुर्दैवी घटना घडली. स्थानिक दूध उत्पादक शेतकरी बाळासो जाधव यांच्या गोट्याला अचानक करंट लागल्याने सहा दुभत्या गाईंचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.घटनेची माहिती मिळताच मा.खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील,विलासराव नलवडे, भाजपा तालुका अध्यक्ष अमित रणवरे, राजेंद्र काकडे, विक्रांत झणझणे, विशाल झणझणे, नंदू झणझणे, किरण जाधव, निखिल काटकर तसेच अनेक ग्रामस्थ आणि शेतकरी बांधवांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.या घटनेत झालेल्या मोठ्या आर्थिक नुकसानीबद्दल सर्व उपस्थित मान्यवरांनी बाळासो जाधव कुटुंबियांचे सांत्वन केले.
मा.खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी शेतकऱ्यांच्या या मोठ्या नुकसानीबद्दल दुःख व्यक्त करत शासनाच्या माध्यमातून व वैयक्तिक स्तरावरही सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.या घटनेमुळे सासवड परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दुःखाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी विजेच्या सुरक्षिततेसंदर्भात प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.


